लॉकडाऊन मुळे शाळा बंद झाल्या मग काम धंद्यासाठी सोळा वर्षाच्या मुलाने सोडले घर ; कुटुंबीय चिंतेत
करमाळा समाचार
लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद पडल्या नंतर कुंभारगाव तालुका करमाळा येथील औदुंबर राऊत याची शाळा बंद पडली. नंतर त्याला घरी थांबून इतर विचार डोक्यात येऊ लागले. काम नाही धंदा नाही शिक्षण नाही अशा विचारात तो कायम राहत असे. अखेर त्यांनी मागील सात दिवसांपूर्वी आपले घर सोडले. तेव्हापासून तो माघारी आला नाही. संपूर्ण कुटुंब त्याचा शोध घेत आहे. सदर फोटोत दिसणारी व्यक्ती कुठे आढळून आल्यास करमाळा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणी दादासाहेब किसन राऊत वय ४० रा. कुंभारगाव ता. करमाळा यांनी करमाळा पोलीस ठाण्यात सदरची माहिती दिली आहे. सदर कुटुंब कुंभारगाव येथे शेती करून उपजीविका चालवते. दरम्यानच्या काळात औदुंबर दादासाहेब राऊत हा अकरावी वर्गात शिकत होता. कर्जत येथील दादा पाटील कॉलेज येथे त्याचे 11 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. नंतर लोकडॉऊन असल्यामुळे शाळा बंद पडल्या. मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण झाले.

ग्रामीण भागात असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हते. दोन वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे शाळा तर नव्हतीच शिवाय हाताला कामही नव्हते असे किती दिवस पडून राहायचे म्हणून औदुंबर याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचे कुटुंबीय त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोळा ते सतरा वर्षाचा औदुंबर हा कामाच्या शोधात घराबाहेर पडला परंतु तेव्हापासून कोणाच्या नजरेत आला नाही. करमाळा पोलीस ही याचा शोध घेत आहेत.
संपर्कासाठी क्रमांक – 8369762594 हराळे साहेब
8766577185 – दादासाहेब राऊत