करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

एकही शिकवणी न लावता नयन वीरची यशाला गवसणी

करमाळा –

करमाळा तालुक्यातील हिसरे येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र नयन पोपट वीर याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक 2021 या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदी निवड झाली आहे.

नयन चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चिखलठाण येथे मामाच्या गावी झाले. बारावी चे शिक्षण वाणिज्य शाखेतून कर्जत येथून झाले व वाणिज्य शाखेची पदवी TC कॉलेज बारामती येथून पूर्ण केली. नयन हा लहानपणापासून हुशार व कष्टाळू मुलगा होता. त्याची आई सौ मंगल वीर या गावातील शाळेमध्ये अंगणवाडी मदतनीस आहेत. त्यांची खूप इच्छा होती की मुलाने शिकून फौजदार व्हावे व त्या प्रेरणेतूनच त्यानंतर एमपीएससी अभ्यास सुरू केला. एमपीएससी चा संपूर्ण अभ्यास कोल्हापूर येथे कोणताही क्लास न लावता केला.

एमपीएससीची तयारी करत असताना त्याच्या आई-वडिलांनी कोरडवाहू असलेल्या शेतीत कष्ट करत त्याला साथ दिली. त्या कष्टाची जाण ठेवून सातत्याने अभ्यास करून नयन ने पीएसआय पदाला गवसणी घातलेली आहे. त्याच्या यशामध्ये नयनला त्याचे मामा, काका , चुलते, बहीण व दाजी असलेले कृषी पर्यवेक्षक निखिल सरडे साहेब यांची मोलाची साथ मिळाली. मिळालेल्या यशाबद्दल गावकऱ्यांनी तसेच आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच माजी सभापती अतुलभाऊ पाटील यांनी अभिनंदन केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE