कालच्या पावसात एक जण ओढ्यात पडुन वाहुन गेल्याने शोधकार्य सुरु
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामध्ये सर्वत्र पाणी आले. शहरातील कुंभारवाडा भागातील ओढ्यांना पाणी आले होते. त्यादरम्यान येथील घोड्यावरुन जात असताना एका 50 वर्षीय व्यक्तीचा पाय घसरून तो ओढ्यात पडला त्यावेळी तो वाहत जाताना काही युवकांना दिसून आला.

सदरची घटना नगरपालिकेला कळवल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार सूर्यकांत मंडलिक वय 50 रा. साठेनगर असे त्या व्यक्तीचे नाव असल्याचे समजले आहे. तरी जेसीबी च्या सह्याद्री ओढ्यामध्ये शोध घेतला जात आहे.
