तालुक्यातील एकापाठोपाठ दुर्घटनाचे सत्र सुरूच ; सतरा वर्षाचा युवकाचा बुडुन मृत्यु
करमाळा समाचार
तालुक्यातील एकापाठोपाठ दुर्घटनाचे सत्र सुरू असून रामवाडी येथील सतारा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदरचा प्रकार आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निमतवाडी परिसरात घडला आहे. काही दिवसांपूर्वी कुगाव येथून जलवाहतूक करताना सहा जण बुडाले होते. तर रायगाव येथील एकावर वीज पडून मृत्यू झाला होता.

रामवाडी ता.करमाळा येथील ऋषिकेस बाळासाहेब वारगड वय १७ याचे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निमतवाडी येथील उजनी पात्रात पाण्यातील मोटर ओढण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला माघारी फिरता आले नाही व त्यावेळी त्या प्रवाहात त्याचा भरून मृत्यू झाला आहे. यामुळे रामवाडीसह तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
