करमाळासोलापूर जिल्हा

शेतीपंपाचे वीज बिल माफ करा व घरगुती बीलास सुट द्या, अन्यथा आंदोलन

करमाळा समाचार

 

 

करमाळा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून शेतीपंपाचे कनेंक्शन तोडण्याची मोहिम चालू होती परंतु तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक संघटनांनी आवाज उठवला त्यामुळे तोडलेले वीज कनेक्शन जोडण्यात आले तरी काही भागात कनेक्शन अद्याप जोडले नसल्याने तात्काळ जोडावेत आणी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बील माफ करण्यात यावे तसेच ‌घरगुती बीलात सुट देऊन राहिलेले बील भरण्यास सवलत देण्यात यावी महावितरण कंपनीने चालवलेली मोहिम कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर तरी थांबवावी उर्जा मंत्र्यानी वीज बील माफ करू असा दिलेला शब्द पाळावा या मागणीचे निवेदन करमाळा महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

पुढे निवेदनात म्हटले आहे की , कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे आणी कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबवावी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांनवर चालवलेला अन्याय थांबवावा मागील सरकारने शेतकऱ्यांनवर अन्याय केला नव्हता वीज कनेंक्शन तोडण्याच्या संदर्भात कधीच राजकारण केले नाही. मागील सरकार शेतकऱ्यांच्या बाजुने होते. मग महाविकास आघाडी सरकार अन्याय करत असेल तर असले राजकारण थांबवावे आणी शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

अशा निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , उर्जा मंत्री , विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र राज्य, तहसीलदार समीर माने करमाळा, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे उर्जा मंत्री यांनी दिलेला शब्द पाळावा अन्यथा‌ भिमदल संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल अशा इशारा भिमदल संघटनेच्या वतीने देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना भिमदलचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले,  संजय गांधी निराधार समितीचे सदस्य नरेंद्रसिंह ठाकुर, माजी उपसभापती लालासाहेब पाटील,  ग्रामपंचायत सदस्य शहाजीराजे ठोसर , रासपा तालुकाध्यक्ष अंगद देवकत्ते, आर पी आयचे तालुकाध्यक्ष अर्जुनराव गाडे, पैलवान विजय भोसले इत्यादी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE