करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

फसवणुक करणाऱ्या उसतोड मुकादमांच्या मुसक्या आवळल्या ; सोलापूर ग्रामीण व करमाळा पोलिसांची कामगिरी

करमाळा समाचार

सन २०२०-२०२१ उस गळीत हंगामासाठी ठरलेल्या कराराप्रमाणे सोमनाथ झोळ यांचे कडुन ७,००,०००/- रू रोख व ऑनलाईन रक्कम घेवुन उस तोड कामगार देतो असे म्हणुन एक ही कामगार न देता झोळ यांची एकूण ७,००,०००/- रू रक्कम परत न केलेमुळे व दिलेला चेक बाउन्स केल्यामुळे संबंधित संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये प्रकाश नफु शिंदे रा. राजाबाई शेवाळी, पो. ककानी, ता. साकी, जि. धुळे यांच्यावर गुन्हा दाखल होता.

सदर प्रकरणामध्ये संशयीत आरोपी हा न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाकडुन आरोपी नामे प्रकाश नफु शिंदे रा. राजाबाई शेवाळी, पो. ककानी, ता. साकी, जि. धुळे याचे विरूध्द पकड वॉरंट काढण्यात आलेले होते.

politics

पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी एन बी डब्ल्यु वॉरंट मधिल आरोपी अटक करणेबाबत वेळोवेळी आदेशीत केलेले होते. त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/शिंदे व त्यांची टीम ता साकी जि धुळे येथे रवाना करण्यात आलेली होती.

तेथे गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणा आधारे सदर वॉरंट मधिल आरोपी प्रकाश नफु शिंदे रा. राजाबाई शेवाळी, पो. ककानी, ता. साकी, जि. धुळे याला दि १७/०८/२०२४ रोजी राहते घरातुन ताब्यात घेवुन अटक करून मा प्रथमवर्ग न्यायालय करमाळा यांचे न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोन रोहित शिंदे, पोना प्रदिप चौधरी, पोशि धनाजी रामगुडे, पोकॉ संदिप शिंदे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोना व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE