करमाळासोलापूर जिल्हा

आपण करमाळ्यात आहोत की गडचिरोली सारख्या नक्षली भागात ; या घटनेमुळे अनेकांना पडला प्रश्न

करमाळा समाचार


पहाटे चार वाजता पडलेले झाड दुपारचे दोन वाजत आले तरीही अजून रस्त्याच्या बाजूला कोणीही काढले नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपण करमाळा शहरात आहोत की गडचिरोली भागात हेच लोकांना कळत नसल्याचे ही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. झाड काढण्याचे पण पुढे झाड ज्या घरावर पडलेय त्याच्या नुकसानीचे काय ?

सामान्य व्यक्ती आपल्या कामात असल्याने प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कोण पुढे येत नसले तरी लोकांना होणारा त्रास आहे कमी करण्याचे काम प्रशासनाचे असते. करमाळा बस स्थानक ते राशीन रोड या मार्गावर महावितरण रस्त्याला एक झाड उन्मळून पडले. त्याने पूर्ण रस्त्याचा परिसर व्यापला. हे झाड पहाटे चार वाजता पडलेले असताना दुपारचे तब्बल दोन वाजले तरी एकही अधिकारी त्यादिशेने फिरकला नाही. त्यामुळे बाहेर गावाहून येणारे तसेच करमाळा शहरातील नागरिकांना आपली वाट पुन्हा बदलून जावे लागत होते. तर महावितरण शेजारी पडलेले झाड व त्या दिशेने वाहत जाणारी वाहने यांचे दिशा बदलणे गरजेचे असताना तेही ही प्रशासनाच्या वतीने होताना दिसत नाही.

सुरुवातीला हे झाड काढण्याचे काम बांधकाम विभागाचे असून त्यांच्याकडून काढून घेतली जाईल म्हणून नगरपालिका शांत होती. तर बांधकाम विभागाने स्पष्ट केल्यानंतर नगरपालिका आता जागी झाली आहे. इथून पुढे ते झाड काढण्याची तयारी होताना दिसून येईल. पण तब्बल दहा तास उलटत आले तरीही अजूनही ते झाड बाजूला काढले गेले नसेल तर किती लोकांना याचा मनस्ताप झाला असेल याचा विचार न केलेला बरा. यासंदर्भात लोकांनी संबंधित विभागांशी संपर्क करून लवकरात लवकर झाड काढून घ्यावे अशी मागणी केल्यानंतर आता कुठेतरी प्रशासन जागे झालेले दिसून येत आहे. पण अजूनही एकही माणूस तिकडे फिरायला नाही.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE