सोगाव गावावर लक्ष ठेवणार तीसरा डोळा ; ग्रामपंचायतीचा निर्णय
वाशिंबे – सुयोग झोळ
सोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व गावच्या विकास कामामध्ये अडथळा ठरनाऱ्या काही अपप्रवृत्त गोष्टीवर चोवीस तास नजर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत.

त्याचे प्रक्षेपण हे ग्रामपंचायत कार्यालय येथे होत आहे. भविष्यात ही ईतर ठिकाणी कँमेरे बसविण्यात येणार आहेत अशी माहिती सोगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पलता गोडगे यांनी दिली.
सोगाव ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक संपूर्ण पश्चिम भागातील गावांमधून होत असून ईतर गावातील ग्रामपंचायती याचा आदर्श घ्यायला हवा असे मत पश्चिम भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या आदी कोरोना विषाणू जन्य रोगाच्या पाश्वभूमीवर मोफत सँनिटायजर,आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, थर्मल स्कॅनिंग, रक्तदान शिबीर,असे स्तुत्य उपक्रम गावातील नागरीकांची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात आले आहेत.