कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलावंतावर उपासमारीची वेळ ; शासनाकडुन आर्थिक मदतीची मागणी
प्रतिनिधी सुनिल भोसले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमाशा कलावंतांनवर उपासमारीची वेळ आल्याने शासनाने आर्थिक द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे नीतीन खटके यांनी केली.

पुढे बोलताना म्हणाले कोरोना पार्श्वभूमीवर सध्या यात्रा-जत्रा वर बंदी आली असून तमाशा, भारूड, शाहीरी या कलावंतावर अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे तेव्हा शासनाने अशा कलावंतांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

नितीन खटके यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाने यावर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये यात्रा उत्सव व जत्रा भरण्यास परवानगी दिली त्यामुळे यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते मात्र पंधरा दिवसाच्या आतच या उत्सवावर शासनाने पुन्हा बंदी घातल्यामुळे तमाशा कलावंत यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याची त्यांनी निवेदनात म्हटले आहे गावाची यात्रा जत्रा आली म्हटल्यावर तमाशा हा येतोच तमाशा म्हटल्यावर सर्वसामान्याचे करमणुकीचे साधन असते मात्र सध्या तमाशा कलावंत यावरच उपासमारीची वेळ आली आहे.
दरवर्षी प्रमाणे दीपावली नंतर ग्रामीण व शहरी भागातील अनेक यात्रा-जत्रा व उत्सव प्रतिवर्षी होत असतात ग्रामीण भागांमध्ये लोकांची करमणूक करण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमात लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा दाखवण्यात येतात या लोककलेची महाराष्ट्र सह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असते महाराष्ट्रात शेकडो लोकनाट्य तमाशा मंडळ आहे यामध्ये हजारो कलावंत आपली कला दाखवत असतात यामुळे तमाशा मंडळ मध्ये अनेकांना रोजगाराची संधी मिळालेली असते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या तमाशाच बंद असल्याने तमाशा कलाकारावर अक्षरशा उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे तेव्हा शासनाने त्यांच्या कलेची कदर पाहता त्यांना त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी नितीन खटके यांनी निवेदनाद्वारे केली.