करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

लंपी संशयीत लक्षणे आढळल्याने तालुक्यातुन तीन गावातुन नमुने तपासणीस पाठवले

करमाळा:

फोटो – संग्रहीत आहे. हा फोटो सोशल माध्यमातून घेतलेला आहे.


सध्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव, अहमदनगर, पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये पाळीव जनावरामध्ये लंपी या रोगाने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरावर होत आहे तो करमाळा परिसरात होण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे या रोगावरील लसीची उपलब्धता लवकरात लवकर प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे. परंतु शासनाकडुन याचे काही निकष आहेत त्यामुळे पुरवठा होत नाही. तर दुसरी कडे पशुखाद्याचे भाव वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

प्रामुख्याने अहमदनगर जिल्हा या रोगाचे प्रमुख अग्रबिंदु बनला आहे. नगर जिल्हा हा करमाळा तालुक्याच्या लगत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव करमाळा तालुक्यात होण्याची चिन्ह आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
गत दोन वर्षापासुन कोरोना सारख्या महारोगाने शेतकरी राजाचे कंबरडे मोडलेले असताना आता पाळीव जनावरावर आलेले संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला येईल.

आजच्या वाढत्या महागाईने पाळीव प्राण्यांना साभाळणे अतिशय अवघड झालेले असताना आणखी किती संकटाचा सामना शेतकऱ्यांनी करायचा याचा विचार प्रशासनाने करायला हवा. मागील काही दिवसापासुन जरी लंपीची भिती असली तरी अद्याआ तरी करमाळा तालुक्यात एकही जनावराला याची बाधा झालेली नाही. तर करमाळा तालुक्यातील वीट, करमाळा व कोंढेज येथील तीन नमुने हे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याच्या तपासणी नंतर पुढील टप्पा ठरवला जाईल. बाधीत जनावर मिळाल्यास तालुक्यात मोफत लसीकरण केले जाणार असल्याची माहीती संबंधित विभागाकडुन दिली जात आहे.

पशु खाद्याच्या किंमतीतही वाढ …
मागील एक महिन्यापासून पशुखाद्याच्या दरात सुमारे 10% ची वाढ झाली असून सर्वाधिक वापरात असलेल्या गोळी पेंडीच्या दरामागे पंधरा दिवसात तब्बल साठ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या गोळीपेंडीचे पोते १५०० ते १६०० रुपयाला असून ,खपरी २३०० ते  २७००, गहू भुस्सा ९०० ते १०५०, मका भरडा १४००ते १५०० प्रति ५० किलो असा दर आहे. मात्र याच दरम्यान सरकी पेंडीच्या दरात किंचित घट झाली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE