E-Paperकरमाळा

बार्शीकरांनी दुर्दैवी निर्णय घेऊन करमाळ्यासह परिसरातील रुग्णांवर अन्याय केला आहे ; जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे

करमाळा समाचार

आज दि.20 एप्रिल रोजी बार्शी येथे बार्शी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन एक निर्णय घेतला आहे असे समजत आहे. तो निर्णय  ‘बार्शी वगळता इतर तालुक्यातील कोणतेही रुग्ण बार्शी मध्ये ऍडमिट करून घेतले जाणार नाहीत’ असा असल्याने अतिशय गंभीर बाब आहे. तरी आम्ही आपल्याला विनंती करतो की हा निर्णय हा माणुसकीला धरून नसून सर्वसामान्य गरीब कुटूंबातील लोकांच्या जीवाशी खेळणारा निर्णय आहे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी व्यक्त केले. तर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

संविधानाची पायमल्ली करणारा हा निर्णय असून भारतीय म्हणून आणि करमाळा तालुक्यासह बार्शी जवळील इतर जिल्ह्यातील नागरीक हे बार्शी येथे उपचारासाठी जात असतात. कोरोनाच नव्हे तर इतर वेळीही बार्शीच सर्व आजारांवर उपचाराला ठिकाण आहे. पण आज घेतलेल्या निर्णयामुळे माणुसकीला काळीमा फासला जातोय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा करमाळा तालुका अध्यक्ष म्हणून या निर्णयामुळे करमाळा तालुक्यासह परिसरातील रुग्णांबाबतीत चिंता व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या करमाळा तालुक्याने भविष्यात कोणत्याही इतर तालुक्यांवर अवलंबून न राहण्यासाठी आपण करमाळा तालुक्यात लवकरात लवकर वैद्यकीय सेवा तयार कराव्यात आणि आपल्या तालुक्यातील रुग्णांना योग्य ती सेवा द्यावी त्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक कायम आपल्या सोबत आहोत.

ads

तरी जिल्हाधिकारी, आमदार व पालक मंत्र्यांनी लक्ष घालु लवकरात लवकर बार्शीच्या या निर्णयाला स्थगिती देऊन तो निर्णय मागे घेण्यास तिथल्या लोकप्रतिनिधी यांना भाग पाडावे नम्र विनंती. अन्यथा या निर्णयाच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही यावेळी घोलप यांनी दिला आहे.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE