करमाळाताज्या घडामोडी

रुग्णालयात ऑक्सीजन लाईन टाकण्याचे काम तात्काळ सुरू होणार

प्रतिनिधी – करमाळा समाचार 


कोरोना आजारामुळे ऑक्सिजन बेडचा तुटवडा करमाळा मतदारसंघात जाणवत असल्याकारणाने रुग्णांचे हाल होत होते. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील करमाळा उपजिल्हा रुग्णालय आणि जेऊर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ऑक्सीजन बेड ची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी आ. संजयमामा शिंदे यांनी जिल्हाधिकारी तसेच आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे साहेब यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आलेले असून आजपासून या रुग्णालयात ऑक्सीजन लाईन टाकण्याचे काम तात्काळ सुरू होत आहे.


सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यात कोरोना आजाराने थैमान घातलेले असताना ऑक्सिजन अभावी रुग्णांची हेळसांड होत होती. ही हेळसांड थांबविण्यासाठी मतदार संघातच ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ऑक्सिजन लाईनचे काम होणे गरजेचे होते ते काम आज सुरू होत आहे अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE