करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मराठा सेवा संघाचे कार्य प्रेरणादायी- तहसीलदार शिल्पाताई ठोकडे

करमाळा समाचार


करमाळा तालुका मराठा सेवा संघाचे कार्य हे सर्व बहुजन महामानवांच्या विचाराने चालते. यामुळे करमाळा तालुक्यामध्ये शांतता आणि सर्वधर्मसमभाव सौख्य टिकून आहे याबद्दल मला मराठा सेवा संघाचा अभिमान आहे. मराठा सेवा संघ 2025 च्या दिनदर्शिका दिनदर्शिकेचे प्रकाशन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे व डीवायएसपी अजित पाटीलसाहेब करमाळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पत्रकार बांधव तसेच विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करमाळा तहसील येथे संपन्न झाले.

यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे व संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, गणेश कुकडे यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्रा. शिवाजीराव बंडगर मा. सभापती मार्केट कमिटी, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, जोतीराम लावंड सरपंच सौंदे, ॲड. नवनाथ राखुंडे नगरसेवक, ॲड. सविताताई शिंदे, संदीप तळेकर प्रहार, अंगद देवकते रासप, अण्णा सुपनवरवर शेतकरी संघटना, अर्जुन गाडे RPI इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप , मकाई कारखान्याचे माजी चेअरमन युवा नेते दिग्विजय बागल , करमाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते विलासराव घुमरे सर , टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी जाधव , भाजपचे जिल्हा नेते गणेश चिवटे, ता. अ. रामभाऊ ढाणे , काँग्रेसचे प्रताप जगताप , मकाई कारखान्याचे संचालक अमोल यादव , नगरसेवक संजय सावंत , अतुल फंड , प्रवीण जाधव , महादेव फंड , सचिन घोलप , सरपंच विनय ननवरे जि. प. सदस्य संतोष वारे , सावंत गटाचे नेते सुनील सावंत , सामाजिक कार्यकर्ते विजय लावंड , राष्ट्रवादीचे शिवराज जगताप , मनसेचे संजय घोलप , भारिपचे शहाजी ठोसर , देवा लोंढे , नेते देवानंद बागल , डॉक्टर रोहन पाटील , म नगराध्यक्ष दीपक ओहोळ , अमोल लावंड

politics

शिवसेनेचे पंकज परदेशी, जमीर सय्यद सकल मुस्लिम समाज आदी सर्वांच्या हस्ते विविध ठिकाणी कॅलेंडरचे प्रकाशन संपन्न झाले.
यावेळी या संपूर्ण कार्यक्रमासाठी पत्रकार सिद्धार्थ वाघमारे , पत्रकार विशाल घोलप , पत्रकार आलीम शेख , पत्रकार अशोक मुरूमकर , पत्रकार विशाल परदेशी , पत्रकार नासीर कबीर , पत्रकार विजयकुमार निकत , पत्रकार नरसाळे आदी पत्रका हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्याचप्रमाणे सर्वांना दिनदर्शिका भेट ही देण्यात आली. तसेच मराठा सेवा संघाचे कौतुक सर्वांनीच केले याबद्दल सर्वांचे ऋण मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी मानले व पुढील काळातही असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा केली .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE