करमाळासकारात्मकसोलापूर जिल्हा

विजापूर फास्ट पँसेंजर गाडी नियमीत करून केम येथे थांबा मिळावा

केम प्रतिनिधी – संजय जाधव 

मुंबई – चेन्नई मेल रेल्वे च्या नवीन वेळापत्रकानुसार बंद झाल्याने केम येथील पास धारकांचे व इतर प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तरी मुंबई विजापूर ही फास्ट पँसेंजर गाडी नियमीत करून केम येथे थांबा मिळावा अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व माजी सरपंच अजित दादा तळेकर यानी केली आहे.

केमहून कुर्डुवाडी सोलापूर जाण्यासाठी सकाळी सात वाजता मुंबई -चेन्नई मेल होती व सोलापूर येथून सांयकाळी ६:२० वाजता मेल सुटत होती, ती सांयकाळी केमला आठ वाजता पोहचत होती. त्यामुळे या गाडीने कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, पंढरपूरहून पासधारक प्रवासी येत होते. त्यामुळे ही गाडी सोयीची आहे. आता मेल बंद झाल्याने विजापूर मुंबई गाडीला थांबा दिल्यास ही गाडी आठवड्यातून चार दिवस आहे. सोमवार ते गुरुवार असी आहे. शुक्रवार ते रविवार सोलापूर येणारी पासधारक व प्रवाशी कसे येणार ? त्या साठी रेल्वेप्रशासनाने ही गाडी नियमीत करून सोलापूर हून सांयकाळी सहा वाजता सोडावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. तसेच केम स्थानकावर पुणे सुपर फास्ट ईंद्रायणी गाडिला सोलापूरला जातानी थांबा मिळावा. यामागण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार व रेल्वे बोर्डाचे सदस्य रणजितसिंह निंबाळकर यांची भेट घेणार असल्याची माहिती अजित तळेकर यानी दिली.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE