करमाळ्यात दिवसाढवळ्या सोनाराच्या दुकानातुन चोरी ; तीन जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी – करमाळा समाचार
सोने खरेदी करण्याच्या बहान्याने करमाळा येथे मुख्य रस्त्यावरील मे. आनंदी ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानांमधून अज्ञात दोन महिला व एका पुरुषांनी तब्बल दोन तोळ्यांचे शॉर्ट गंठण लांबवल्याची घटना घडली आहे. सदर घटनेबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


दिनांक 19 ऑगस्ट रोजी करमाळा शहरातील मुख्य रस्त्यावर गांधी (जयमहाराष्ट्र) चौक येथे आनंदी ज्वेलर्स सोन्या-चांदीचे दुकान आहे. सध्या कोरोना महामारी मुळे सर्वत्र तोंडाला मास्क लावून दुकानात प्रवेश करणे बंधनकारक असल्यामुळे त्याचा फायदा उचलत दोन महिला व एका पुरुषांनी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास दुकानात प्रवेश केला व सोने पाहण्याच्या बहाण्याने दाखवण्यात आलेल्या सोन्या पैकी दोन तोळ्यांचे शॉर्ट गंठण लांबले आहे. तिघेही दुकानाबाहेर पडल्यानंतर ही बाब दुकान चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यापूर्वी तिघांनीही पलायन केले होते. याबाबत घटनेची माहिती करमाळा पोलिसात दिल्यानंतर तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.