करमाळासोलापूर जिल्हा

गणेशोत्सव व मोहरमसाठी एकच नियमावली – स.पो.नि. प्रकाश वाघमारे

प्रतिनिधी- दिलीप दंगाणे

आगामी गणेशोत्सव व मोहरम सणाच्या अनुषंगाने करमाळा पोलीस ठाणे अंकित जिंती आउट पोस्ट येथे सर्व गावातील गावकामगार पोलीस पाटील व मोहरम मंडळाचे अध्यक्ष जि प सदस्य सरपंच प्रतिष्ठित नागरिक व स .पो.नि . वाघमारे व स .पो. नि. भुजबळ विद्यमान जि .प .सदस्य सवितादेवी राजेभोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग संपन्न झाली. सदर मिटिंग कामी जिंती आऊट पोस्ट अंकित गावातील 70 ते 80 लोकांनी सहभाग नोंदवला. यावेळी गणेशोत्सव व मोहरमसाठी एकच नियमावली असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे यांनी जाहीर केले.

सदर मीटिंगमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सोलापूर माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी करमाळा विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिलेल्या सूचनेचे वाचन करून सर्व गावकामगार पोलीस पाटील व मंडळाचे अध्यक्ष मोहरम मंडळाचे अध्यक्ष व ग्रामस्थ व संबंधितांना समजावून सांगण्यात आल्या. आगामी गणेशोत्सव व मोहरम सण सौंदाहर्य पूर्ण वातावरणात तसेच कोरोना रोगाच्या अनुषंगाने योग्य ती काळजी घेऊन पार पाण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी स.पो.नि वाघमारे पी व्ही, स.पो.नि . भुजबळ पी एन, जि प सदस्या सवितादेवी राजेभोसले, जिंती गावचे सरपंच संग्रामराजे भोसले, उपसरपंच संजय भोसले ना.चेतन पाटील, पो काॅ संदीप शिंदे, पो काॅ जालिंदर गोरे, पैं नानासाहेब वाघमोडे, निलेश वारगड, दगडू मुलानी, मोहन राऊत, मल्हारी ओंबासे, तुकाराम राऊत, जिंती पोलीस स्टेशन अंकित सर्व गावकामगार पोलीस पाटील व मंडळाचे अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE