ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलुप तोडून सिसिटिव्ही कॅमे-याची चोरी
करमाळा समामाचार
कंदर तालुका करमाळा येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलुप तोडून सिसिटिव्ही कॅमेरा तोडून चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत करमाळा पोलिसांत अज्ञात आरोपीच्या विरोधात याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

जयश्री शत्रूघ्न सुतार (वय 38 ) या ग्रामसेवक कर्मचा-यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. 7) ते सोमवार (ता.10) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
याबाबतची हकीकत अशी की, शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालय बंद करून गेल्यावर अज्ञात इसमाने कंदर येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे दरवाजाचे कुलुप तोडले आहे. तसेच कार्यालयाबाहेर लावलेला दोन हजार रुपये किमंतीचा सिसिटिव्ही कॅमेरा तोडून चोरून नेला आहे. याची माहिती सकाळी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचा-यांच्या निदर्शनास येताच त्याने याची माहिती ग्रामसेविका जयश्री सुतार यांना सांगितली.

त्यानंतर ग्रामसेविका जयश्री सुतार यांनी करमाळा पोलिसांत तक्रार देताच करमाळा पोलिसांनी झालेल्या घटनेचा पंचनामा केला आहे. याबाबत करमाळा पोलिसांनी भादवी 454,457,379 अन्वये गुन्हा दाखल केला असून हवालदार निखिल व्यवहारे पुढील तपास करीत आहेत .
**