करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सावडीच्या अपहरण नाट्यावर पडदा पण अद्यापही उपसरपंचपदावर टांगती तलवार ?

करमाळा समाचार

तालुक्यातील सावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. यामुळे प्रभारी तहसीलदार विजयकुमार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि ३) सकाळी ११ वाजता होणार होती. पण सदरची करण्यापुर्वी सिंधू ठोंबरे वय ६५ या मिळुन न आल्याने शिवाय इतर सदस्यही सभेला हजर राहिले नाहीत. म्हणुन तहसिलदार विजयकुमार जाधव यांनी सभा निष्फळ झाल्याचे जाहीर केले. पण आता वरिष्ठाकडे सदर प्रकरणाचे इतिवृत्त पाठवले आहे. तर विरोधक जिल्हाधिकारी यांच्याकडेही दाद मागण्याच्या तयारीत आहेत. त्यावर जिल्हाधिकारी पुढील निर्णय घेणार आहेत. सध्यातरी वेळ मारुन नेली असलीतरी पुढे काय निर्णय होईल याकडे लक्ष राहिल. यामध्ये वरिष्ठाकडुन सुचना आल्यानंतरच उपसरपंचपद राहिल जाईल हे स्पष्ट होणार आहे.

यासंदर्भात ठोंबरे कुटुंबीयांनी करमाळा पोलीस ठाण्यात सिंधु ठोंबरे या मिसिंग असल्याची नोंद केली होती परंतु सायंकाळी त्या मिळाल्या असल्याची माहीती पोलिसांनी दिली. तर दिवसभर अपहरणाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली होती पण नाट्यमयरित्या यातुन ठोंबरे यांनी प्रकरण वाढवण्याचे टाळले.

सावडी ग्रामपंचायतीत ११ सदस्य आहेत. त्यातील १० सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. उपसरपंच एकाड हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. या सभेसाठी महादेव येदवते, सागर भराटे, मारुती तळेकर, पूनम ठेंबे, कोमल एकाड, सिंधबाई ठोबरे, कोमल जाधव, रामचंद्र शेलार, शैला जाधव, शशिकला शेळके व महेंद्र एकाड असे सदस्य उपस्थित राहणे अपेक्षीत होते.

घटनाक्रम….
अविश्वास ठराव आणण्याच्या हेतूने सर्व सदस्य एका ठिकाणी हलवण्यात आले होते. परंतु सिंधू ठोंबरे यांच्या आईचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे त्यांना तिथेच ठेवण्यात आले. परंतु याचाच फायदा उचलत विरोधकांनी बुधवारी अकरा वाजता त्यांना घेऊन गेले व सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच माघारी घेऊन आले. दरम्यान ठोंबरे यांची मुले व मुलगी यांनी करमाळा पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी आई हरवल्याची तक्रार त्यांनी नोंदवली तर तपास करून अपहरणचा गुन्हा दाखल होणार होता. परंतु सायंकाळच्या सुमारास सिंधू ठोंबरे या माघारी परतल्या व त्यांनी स्वखुशीने गेल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्व प्रकरणावर पडदा पडदा

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE