अजुनही शेलगाव येथे नरभक्षक बिबट्याचा वावर तर सालसे परिसरातही हल्ल्याची चर्चा ; तालुक्यात सगळीकडे दक्ष राहणे गरजेचे
सध्या वनविभागाला शेलगाव भागात बिबट्याचे ठसे दिसुन आले आहेत. तर सालसे भागात नागरीकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. मिळालेली माहीती वरुन सालसे परिसरातही बिबट्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या शेलगाव भागात तपास सुरु आहे.
करमाळा समाचार

तालुक्यात रोज नवीन नवीन ठिकाणी बिबट्या असल्याबाबत चर्चा व अफवांमुळे वन विभागाचे स्थान व टेन्शन नक्कीच वाढलेले आहे तर या आपण मुळेच सध्यातरी बिबट्या आपल्या पासून चार हात लांब जाण्यात यशस्वी होत आहे रात्री सालसे परिसरात बिबट्या ने हल्ला केल्याची चर्चा तर आज सकाळी पुन्हा शेलगाव (वांगी) येथे बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.
सध्या सोशल माध्यमाच्या ब्रेकिंग न्यूज किंवा आपली माहिती आधी पोहोचवण्याच्या नादात प्रत्येकजण आमच्या भागात कन्फर्म दिसला अशा वावड्या उठत आहे. मुळातच एकापेक्षा अधिक बिबटे असल्याने इतरही ठिकाणी बिबट्यांचा वावर असू शकतो. त्यामुळे त्या भागात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ज्या बिबट्यांनी चिकलठाण परिसरात शेवटचा हल्ला करून एका नऊ वर्षाच्या मुलीचा बळी घेतला. त्या बिबट्या नरभक्षक असून त्याला पकडणे ही सर्वात मोठी जबाबदारी सध्या विभागावर आहे. तर त्याला पकडण्यासाठी नागरिकांनाही प्रतिसाद त्याच पद्धतीने देणे अपेक्षित आहे. अनेक ठिकाणी तर कुत्रे आणि तरस चे हल्ले झाल्यानंतर ही वनविभागाने त्या ठिकाणी येऊन गस्त घातली पाहिजे असेल नागरिकांची अपेक्षा आहे. पण वन विभाग योग्य त्या दिशेने जात असून तीन दिवसापासून शेटफळ, चिकलठाण परिसरात तळ ठोकून आहेत. त्यांना त्याच परिसरात बिबट्या असल्याचा संशय आहे.

पण काल सालसे येथे एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची चर्चा झाली व वन विभाग विभागून सालसे परिसरात ही गस्त घालण्यासाठी गेले आहे . त्या परिसरात ही बिबट्या असेलही पण बिबट्याचे ठसे अद्याप वनविभागाला मिळुन आले नाहीत. त्या भागात तरस असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. तरीही बिबट्या हा रात्रीत किंवा दिवसभरात 15 ते 20 किलोमीटरचे अंतर सहज पार करू शकतो. त्यामुळे शेलगाव वरुन सालसे व सालसेहुन शेलगाव किंवा अजून अनेक वेगळ्या ठिकाणीही जाऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील कोणते ठिकाण हे निर्धास्त फिरण्यासारखे नसून केव्हाही कधीही कुठेही बिबट्या सारखा प्राणी येऊन आपल्यावर हमला करू शकतो. मागील तीन दिवसांपासून बिबट्या उपाशी असल्याने मनुष्यावर जरी हमले झाले नसले. तरी सध्या तो पाळीव प्राणी किंवा जंगली प्राण्यांवर हल्ले करत असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. तर त्याला तेही मिळणे बंद झाले. तर तो पुन्हा मानवी वस्तीत शिरून न घाबरता हल्ला करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.