करमाळासोलापूर जिल्हा

कारखानदारांनी व मालकाने ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेतेची हमी घ्यावी,अन्यथा ऊस तोडणी थांबवावी

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा तालुक्यामध्ये नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याने आठ दिवसापूर्वी करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी या गावातील तरुणावर हल्ला केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनंतर अंजनडोह येथील एका महिलेवर हल्ला केला आणि दोन दिवसांनंतर चिकलठाण येथील ऊस तोडणी कामगारांच्या नऊ वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. तीन्ही झालेल्या घटना धक्कादायक आहे.

या झालेल्या घटनेकडे पूर्ण प्रशासनातील सर्व अधिकारी व वनखात्यातील सर्व अधिकार कर्मचारी पूर्ण ताकदीनिशी उतरून बंदोबस करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातून सुद्धा नरभक्षक बिबट्या एक दिवसाआड हल्ला करत आहे. हा बिबट्या एक नसून अनेक आहेत अशी चर्चा होत असलेली नाकारता येत नाही. या झालेल्या सर्व दुदैवी घटना घडल्या आहेत. या घटना घडु नयेत म्हणुन प्रशासन पोलिस खाते तहसीलदार तसेच वनखात्याने पुर्ण प्रयत्न करून पकडण्यासाठी तयारु केली असली तरी नरभक्षक बिबट्या चलाक आहे तो पकडण्यासाठी अपयश येत आहे. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या तालुक्यात ऊसक्षेत्र जास्त असल्याने ऊस तोडणी कामगार टोळ्या जास्त आहेत. म्हणून बघता बघता एकाच गावात चिकलठाण येथे ऊस तोडणी कामगारांच्या नऊ वर्षेच्या मुलीवर हल्ला केला होता. त्यात ती जागीच ठार झाली. बिबट्या त्याच परिसरात वावरत असल्याने प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपाशी पोटी बिबट्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये फक्त एकाच शुटरला बिबट्या ठार करण्याचा अधिकार आहे. उलट शासनाने पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांना व वनखात्यातीत अधिकाऱ्यांनाही शुट करण्याची परवानगी द्यावी.

जर सर्वांना अधिकार असता तर शेटफळ मधुन 100 मीटर अंतरावरून बिबट्या पळाला नसता. अधिकाऱ्यांनच कौतुक केले पाहिजे उपाशी पोटी ते जनतेच्या संरक्षणासाठी काम करत असताना शेटफळ गावातील तरूण वर्गाने एकत्र येऊन सर्व कर्मचारी व अधिकारी यांना जेवण दिले म्हणुन तेथील गावकऱ्यांचे ही कौतुक केले पाहिजे. या धुमाकूळ घातलेल्या बिबट्या मुळे ऊस तोडणी कामगारांसाठी धोक्याची घंटा आहे . म्हणून कारखानदारांनी व मालकाने कामगाराना सुरक्षा द्यावी त्यांची राहण्याची व्यवस्था करावी. ऊस तोडणी साठी फडावर गेल्यावर पाठीमागे लहान मुले असतात मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांना चांगल्या ठिकाणी पत्राशेड मारून कुंपण करावे जेणेकरून त्यांच्या वर हल्ला होणार नाही ऊस तोडणी कामगार परजिल्ह्यातील असतात त्याच संरक्षण करण कारखान्याची जबाबदारी आहे जोपर्यंत कारखानदारांनी व मालकाने ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेची हमी घेत नाहीत तोपर्यंत ऊसतोडणी थांबवावी जेणेकरून ऊस तोडणी कामगारावर कुठलेही संकट येणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेतली तर त्यांचा जीव वाचू शकतो म्हणून जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत ऊस तोडणी थांबवावी असे शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE