ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोर जेरबंद ; रात्री तीन वाजता आले होते चोर
करमाळा समाचार
पोलीस स्टेशन हद्दीतील पांगारे,तालुका- करमाळा, जिल्हा -सोलापूर गावात शुक्रवारी रात्री 2:50 वाजता करमाळा पोलीस स्टेशनची नाईट राउंडची गाडी राऊंड वर असताना गाडी चालक श्री सचिन घुगे यांना पांगारे गावच्या हद्दीमध्ये संशयित चोर दिसले.


त्यांनी तात्काळ पांगारे गावचे पोलीस पाटील श्री युवराज सावंत यांना ही माहिती कळवली. त्यावेळी पोलीस पाटील यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबर वरून ही माहिती संपूर्ण गावाला आणि पोलिस स्टेशनला कळवली.
काही वेळातच गावातील गावकरी आणि करमाळा पोलिस स्टेशनचे API श्री सचिन जगताप साहेब, गाडी चालक श्री सचिन घुगे, पोलीस पाटील श्री युवराज सावंत तसेच पांगारे ग्रामस्थ हे घटनास्थळी दाखल झाले. चोर ऊसामध्ये लपले असता त्यांचा पाठलाग करून एक चोर आणि मोटरसायकल पकडण्यात यश आले आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे चोर जेरबंद करण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे.