करमाळासोलापूर जिल्हा

जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रसंगावधानाने पकडले चोरटे

करमाळा – (संजय साखरे , दिलीप दंगाने)


काल रात्री साडे दहा ते अकरा च्या दरम्यान जिंती तालुका करमाळा येथील वारगड वस्तीवर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकण्याचा बेत केला होता. याच दरम्यान वारगड व त्यांची मुले जागे झाले व त्यांनी त्यांच्या भावकीतील हरी वारगड यांना फोन लावून चोर आले आहे त्याची कल्पना दिली. हरी वारगड यांनी लागलीच जिल्हा परिषद सदस्य सौ सविता देवी राजे भोसले यांना फोन करून सदर घटनेची कल्पना दिली.

जिल्हा परिषद सदस्य सौ सविता देवी राजे भोसले यांनी क्षणाचाही विलंब न लावता गावातील तरुणांना याची माहिती दिली व स्वतः धुवाधार पाऊस चालू असून देखील स्वतःच्या गाडीत बसून त्या वारगड वस्तीवर गेल्या आणि दरोडेखोरांना तरुणांच्या मदतीने घेराव घातला. रात्रीची वेळ होती मुसळधार पाऊस चालू होता तरी जिवाची पर्वा न करता त्यांनी सोबतच्या तरुणांना बरोबर घेऊन दरोडेखोरांना जागेवरच रंगेहात पकडले.

लागलीच करमाळा पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेची कल्पना दिली व चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिली. दरम्यान रात्रीचे एक वाजले होते. जिल्हा परिषद सदस्य सौ सविता देवी राजे भोसले यांनी केलेल्या या प्रसंगावधानामुळे वारगड कुटुंबीय फार मोठ्या हल्ल्यापासून वाचले व त्यांची आर्थिक आणि शारीरिक हानी टळली.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE