शेलगाव (वां) चौकातील चार दुकानांवर चोरांचा डल्ला ; चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ
जेऊर – प्रतिनिधी
शेलगाव वांगी ता. करमाळा येथील चार दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दुकानातील लाखभर रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना पहाटे उघडकीस आली आहे. कोरोना मुळे अनेकांच्या हाताला काम नसल्याने चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.


सोमवारी रात्री बारा ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान उदय केकान यांच्या इलेक्ट्रॉनिक दुकानासह पांडुरंग कोकाटे, साई हॉटेल, अशोक खराडे दुकान व दत्तकृपा भुसार मालाच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटुन आत प्रवेश केला व इलेक्ट्रॉनिक दुकानातुन टीव्ही, होम थिएटर, फॅन, लाईट बल्प, शेगड्या केबल बंडल, डेकोरेशन मटेरियल अशा सामानासह जवळच्या दुकानातील हाती लागेल ते सामान चोरुन नेले आहे. या चोरीची करमाळा पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरु होते.