करमाळासोलापूर जिल्हा

विविध कामांसाठी साठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात यावी – माजी आमदार पाटील

जेऊर :

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध कामांसाठी साठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचेकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना पाटील यांनी सांगितले की करमाळा तालुक्यातील जनतेला आरोग्यसेवा पुरवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय हे महत्त्वाचे शासकीय रुग्णालय असल्याने या रुग्णालयाचे सक्षमीकरण करण्यासाठी आपण सन 2014 ते 2019 दरम्यान पाठपुरावा केला व काही पायाभुत कामांना मंजुरी मिळवली. सध्या येथे 50 खाटांच्या रुग्णालयाचे 100 खाटांच्या रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी सुमारे 36 कोटी 23 लक्ष 39,760 इतक्या निधीची आवश्यकता आहे.

या कामाच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे व यानंतर निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. 100 खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचे काम 15 जूलै 2019 साली आरोग्य विभागाने एका शासन निर्णयाद्वारे पुर्वीच करुन ठेवल्याने आता हे काम पुर्ण होण्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. तत्कालीन सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सदर 50 खाटा वरून 100 खाटाच्या श्रेणीवर्धन प्रस्तावास मान्यता दिली होती.
या कामाचे बांधकामाबाबत अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,अकलूज यांचेकडून शासनाकडे सादरही करण्यात आले आहे. कोरोनाचा कालावधी व या आजाराची दाहकता लक्षात घेता करमाळा तालुक्यातील गोरगरीब जनतेस याचा फटका बसला. या उपजिल्हा रुग्णालयाचे सक्षमीकरण झाल्यास भविष्यकाळात चांगल्या आरोग्यसुविधा देणे सहज शक्य होईल.

कोरोना कालावधीत करमाळा तालुक्यातील सर्वच आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी दक्ष राहून अतिशय चांगले काम केले. परंतू आज आरोग्यविभागातील कर्मचारी निवासी सोयीपासून वंचित आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या बांधकाम अंदाजपत्रकास तातडीने प्रशासकीय मान्यता मिळाली जावी. सध्या कर्मचारी हे धोकेदायक इमारतीत वास्तव्य करत असुन लोकांचे जीव वाचवणारा हा विभाग केवळ सुरक्षित निवासी सोय नसल्यामुळे जीव धोक्यात घालून काम करत आहे. अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकाम इमारतीच्या रु. 22 कोटी 74 लक्ष 24,982 इतक्या किंमतीचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार केले असुन यास प्रशासकीय मान्यता व निधीची आवश्यकता आहे.

तरी या दोन्ही महत्वाच्या कामांच्या पुर्ततेसाठी आपला पाठपुरावा चालू असुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कडे याकामाबाबत आपण साकडे घातले असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE