डॉक्टरांच्या शेतातील चंदनाच्या झाडांवर चोरांचा डल्ला ; अनोळखी व्यक्ती वर गुन्हा दाखल
करमाळा – समाचार
राजुरी ता. करमाळा येथील एका डॉक्टरांच्या शेतातुन पंधरा वर्षापासुन जपलेल्या चंदनाच्या झाडाची चोरी झाली आहे. ही घटना दि १८ रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणे अनोळखी इसमा विरोधात करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. बिभीषण दादासाहेब सारंगकर (वय ४७) रा. सध्या करमाळा मुळ गाव राजुरी ता.करमाळा यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, डॉ. सारंगकर हे करमाळा येथे जय ॲक्सिडेंट हॉस्पिटल चालवतात. त्यांच्या मुळगावी स्वतः, भाऊ व वडीलांच्या नावे गट क्रमांक २६४/६ वर तीस एकर शेती आहे. राजुरी गावातील या शेताच्या बांधावर दोन चंदनाची झाडे होती. सदर झाडे ही मागील पधरा वर्षापासुन शेताचे बांधावर होती. सदर चंदनाची झाडा निमित्ताने मागील आठवडयात कोर्टी येथील दोन गृृहस्त आले हेाते. त्यांनी त्याचे नावे माने असले बाबत सांगीतले होते. त्यांनी चंदनाची झाडे विकायची आहेत काय असे विचारले होते.
परंतु सारंगकर यांनी त्यांना सदर झाडे ही विकायची नाहीत असे सांगीतले होते. त्यांनतर ते तेथुन निघुन गेले होते. पण नंतर दि १८ रोजी सकाळी वडीलांसोबत डॉ. सारंगकर शेताकडे गेले होते. पण संबंधित झाडे ही बांधावर नसल्याचे दिसुन आले आहेत. मागील पंधरा वर्षापासुन वाढवलेल्या झाडांची प्रत्येकी दहा हजारा प्रमाणे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले आहे. या घटनेचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.
