E-Paperक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

तीन दिवसात तिसरे प्रकरण ; अल्पवयीन मुलीला घरी पाठवल्यावर आणखी एकाला सुखरुप पाठवले

समाचार टीम

नुकतेच दोन प्रकरणे समोर आल्यानंतर आता तिसरे एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात पोलिसांनी तत्परता दाखवत सदर इसमाला आपल्या गावाकडे पाठवण्यास मदत केली आहे. संबंधित तरुण हा मनोरुग्ण असल्याने जिंती येथे रेल्वे स्टेशन परिसरात उतरला होता. हैदराबादहून घेऊन आलेला हा तरुण करमाळ्यात सापडला. त्याला पोलिसांनी माघारी पाठवण्यात योगदान दिले आहे.

मागील चार ते पाच दिवसात एक अल्पवयीन मुलगी प्रेम प्रकरणात निघून आली होती. तिला माघारी पाठवले. तर काही दिवसांपूर्वी एक बारा वर्षे मुलगा चुकलेला होता. त्यालाही त्याच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवण्यात करमाळा पोलिसांनी मुख्य भूमिका पार पाडली. असाच एक प्रसंग दोन दिवसात घडला आहे. यामध्ये एक मनोरुग्ण हैदराबादहून आपल्या घरातून काही न सांगता घरातून निघाला तो कुठे आहे हे माहीत नसल्याने घरच्यांनी त्या संदर्भात हैदराबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

मोहम्मद सुरुर असं त्या युवकाचे नाव आहे. तो हैदराबाद हून 30 जुलै रोजी निघाला होता. एका रेल्वेत बसून जिंती तालुका करमाळा या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर उतरला. त्या ठिकाणच्या लोकांनी ही खबर करमाळा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा भाऊ व कुटुंबीयांना शोधून काढले. त्यानंतर भावाने त्याला तुमच्याजवळ ठेवा, त्याला कुठे पाठवू नका तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण करमाळा येथे आले व संबंधित युवकाला घेऊन माघारी परतले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE