रेल्वेच्या धडकेत तीन म्हशी जागीच ठार ; करमाळा तालुक्यातील घटना
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील पारेवाडी स्टेशन जवळ मालवाहतूक जात असताना परिसरातील जनावरे रेल्वे रुळावरून जात असताना मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडीने धडक दिल्याने तीन म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. सदरची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.

पारेवाडी रेल्वे स्टेशन जवळ किलोमीटर क्रमांक 315/9 व 315/ 6 पावर हाऊस जवळ पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडीने तीन म्हशींना धडकल्याने तीन मशीनच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी 6.10 च्या दरम्यान पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडीस धडकून हा मृत्यू झाला. यावेळी थोडा वेळ रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती नंतर पूर्ववत करण्यात आली.
