करमाळासोलापूर जिल्हा

रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांवर करमाळ्यात गुन्हा दाखल ; वीज पुरवठ्यासाठी केले होते आंदोलन

करमाळा समाचार


बुधवारी शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे यांनी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन उभारले होते. त्याचाच परिणाम म्हणून तात्पुरत्या का स्‍वरूपात होईना वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. परंतु त्या आंदोलनानंतर करमाळा पोलीस ठाण्यात संबंधित आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अतुल खुपसे सह ॲड अजित विघ्ने यांचाही समावेश आहे.

बुधवार पासुन वीज आठ तास सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता. कोरोना पार्श्वभूमीवर आंदोलन दाबण्याचा डाव असु शकतो त्यामुळे खुपसे यांनी गणीमीकावा करीत कार ने न येता तीन चाकी रिक्षात प्रवेश केला व वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना यायला सांगितले. त्यामुळे पोलिसांना चकवा देत आंदोलन यशस्वी केले. यावेळी खुपसे यांच्यासह किरण भांगे,अजित विघ्ने, राणा महाराज वाघमारे, अविनाश कोडलिगे महाराज, नाना तकीक, हनु यादव, शुभम बंडगर, विजय खुपसे यांनी आपले विचार व्यक्त केले.

संदर्भ –

अतुल भैरवनाथ खुपसे रा. उपळवाटे ता माढा व त्याचेसोबत शरद एकाड, रा. सावडी, ता.करमाळा, राणा वाघमारे, रा. आळसूंद, ता.करमाळा, अजित विघ्ने, रा. केत्तूर, ता.करमाळा हनुमंत यादव, रा. वांगी, ता.करमाळा, हनुमंत कानतोडे, रा. केत्तूर, ता.करमाळा यांनी कोणतीही पुर्वपरवानगी न घेता बेकायदेशीर जमाव जमवून स्वत:चे तसेच इतरांचे जिवितास प्रकारे धोका होर्इल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून इतरांचे जिवितास धोकादायक असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पररविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती केल्याने प्रसार करण्यास कारणीभूत झालेले आहेत म्हणून वरील सर्व लोकांविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब), भा.द.वि.कलम 269, 270, 188 व महा.पोलीस कायदा कलम 135, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3, 4 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE