अनैतीकरित्या देहव्यापार करायला लाऊन मारहाण केल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल ; संशयीत आरोपीत करमाळ्यातील महिला
करमाळा समाचार
एका महिलेला डांबुन ठेवून मारहाण करून देहविक्री करायला लावणाऱ्या तिघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोनजण कुर्डूवाडी रोड टेंभुर्णी येथील तर एक महिला करमाळ्यातील आहे, सदरचा प्रकार टेंभुर्णी येथील लॉजवर तर करमाळा येथील त्या संशयित महिलेच्या घरी केला जात होता. सदर प्रकार उघडकीस आल्यावर त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम प्रमाणे त्या तिघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात ती महिला व इतर दोन साथीदार पीडित महिलेला मारहाण करून तिच्याकडून एक कृत्य करून घेत होते. प्रत्येक ग्राहकाकडून 1000 ते दीड हजार रुपये वसूल केले जात होते. पण त्या महिलेला एक रुपया दिला जात नव्हता. केवळ जेवणासाठी तिची सोय करण्यात आली होती.

या सर्व प्रकारांमध्ये जवळपास चार लाख रुपये रक्कम त्या बाईकडून व्यापार करून गमवण्यात आले होते. त्यामुळे ती रक्कम मागण्यासाठी महिला गेल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. या मारहाणाईनंतर ती पिढीत महिला थेट पोलीस ठाण्यात पोहचली व सर्व संशयित आरोपींच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे करत आहेत.