मुंबई पोलिस झाल्याबद्दल तीघांचा सन्मान ; वरकटणे येथे झाला कार्यक्रम
करमाळा समाचार
मुंबई पोलीस भरती झालेबद्दल वरकटणे येथील भैरवनाथ मंदिर वरकटणे येथे संकेत रवींद्र तनपुरे, अभिषेक भैरवानाथ तनपुरे, उमरड येथील साहिल जलील अजीज शेख या मुलांचा सत्कार शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आयोजीत करण्यात आला होता.

यावेळी नायब तहसीदार बाबासाहेब गायकवाड, माजी सरपंच गोकुळ तनपुरे, बापू तनपुरे, ॲड. जयदीप देवकर, बिभीषण देवकर, ग्रामसेवक अंगद माने भाऊसाहेब, प्राध्यापक बिभीषण मस्कर, सोसायटी चेअरमन शरद देवकर, मकाई संचालक सचिन पिसाळ, मच्छिन्द्र देवकर, तानाजी तनपुरे, मुलांचे कुटुंबीय वडील रवींद्र तनपुरे, भैरवनाथ तनपुरे उमरड अजीज शेख व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
