करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीत तीन मोठे गट एकत्र ; निवडणूक अविरोध होण्याची शक्यता

करमाळा समाचार

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता उर्वरित काही सदस्य वगळता इतर सदस्य हे केवळ बागल, जगताप व पाटील यांच्या संपर्कातील आहेत. तर सदरच्या निवडणुकीच्या बिनविरोध होण्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. तर आज अकलूज येथे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तर सदरची निवडणूक अविरोध होण्याची शक्यता आहे.

सदरचे तीन मोठे गट वगळता काही सदस्य माघार घेऊ शकले नाही. तर तेवढ्यापुरत्या जागेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. परंतु प्रमुख गटच एकत्र आल्यामुळे निवडणुकीतील संघर्ष संपणार आहे. तालुक्यातील प्रमुख तीन गटांपैकी जगताप, पाटील व बागल या गटांमध्ये मागील पाच वर्षांपासून संघर्ष बघायला मिळत आहे. सदरचे गट एकत्र येऊच शकणार नाहीत अशी शक्यता असताना सदरच्या तिन्ही गटांना एकत्र आणण्यात मोहिते-पाटील यांना यश आले आहे.

सदरची बैठक सध्या सुरू असली तरी खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार तिनही गट एकत्र आल्याने आता निवडणूक अविरोध होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. थोड्याच वेळात बैठक संपणार आहे. तर नेमकं कोणत्या जागा कोणाला मिळणार व सर्वांच्या माघार घेतल्यानंतर अधिकृत उमेदवार कोण असणार हे अजून जाहीर केले नसले तरी लवकरच घोषणा केली जाईल. सदरची घोषणा कधी होईल याकडे लक्ष लागून राहिले आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE