करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पोंधवडी खुन प्रकरणात तीन संशयीत पोलिसांच्या ताब्यात ; खरा खुनी कोण ? पोलिस शोध सुरु

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथील एका २३ वर्षीय महिलेचा निर्घृण खून करण्यात आला आहे. सदरची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोंधवडी राजुरी रस्त्यावरील वस्तीवर घडली आहे. महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करीत खून करण्यात आला आहे. तिला एक लहान मुल असून मागील तीन वर्षांपासून ती माहेरीच राहत होती. याप्रकरणात संशयीत म्हणून तीघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस सर्व बाजुंनी तपास करीत आहेत.

कोमल बिभीषण मत्रे वय २३ असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोमलचा विवाह गावातीलच मत्रे कुटुंबात झाला होता. मागील तीन वर्षापासून कौटुंबिक कलहातून ती माहेरीच राहत होती. मंगळवारी रात्री काही अज्ञात खाल्लेखोर कोमलच्या घरी आले. सुरुवातीला त्यांनी दरोड्याचा बनाव केला व जाताना कोमल हिच्यावर निर्घृण पणे धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या हल्ल्यात ती जागीच ठार झाली.

politics

रात्री ९ च्या सुमारास सदरचा हल्ला झाल्याची प्राथमीक माहीती मिळाली आहे. पोलिस मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधल्यानंतर पोकॉ. आनंद पवार (मेजर) यांनी सदरची घटना तात्काळ वरीष्ठाना कळवली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले तपास सुरु असताना सदरच्या ठिकाणाहून एक मोटरसायकल पोलिसांच्या हाती लागली आहे.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्री दळवी, हवलदार बालाजी घोरपडे, अझर शेख यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली माहीती घेत असताना तीघांवर संशय आल्याने तीन जण ताब्यात घेतले आहेत. त्यामध्ये महिलेच्या पतीचा समावेश आहे.

काल रात्री उशिरा अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस करीत असताना यामध्ये विविध अंगाने तपास सुरू आहे. सदर प्रकरणातील आरोपी हा कुटुंबीय तसेच महिलेच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे सुरुवातीला सदर ठिकाणी दरोडा सदृश्य परिस्थिती निर्माण करून बनाव करण्यात आला होता. नंतर फक्त खुनाचा डाव असल्याचं लक्षात आलं त्यानुसार पोलीस तपास सुरू आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE