करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

आखाती देशात मागणीने केळीचे दर वाढले ; खान्देशातुन करमाळ्यातील व्यापाऱ्यांना संपर्क वाढला

वाशिंबे प्रतिनिधी:

केळींच्या दरात (banana prices) मागील आठ दिवसांत मोठी वाढ झाली आहे. दर्जेदार केळींना उत्तर भारतासह आखाती देशात चांगली मागणी आहे. आठवडा भरापूर्वी निर्यातक्षम केळीला १४ रुपये प्रति किलो दर होते.

आता १८ते १९ रुपये किलो दर मिळत आहे. करमाळा तालुक्यातील केळींना सध्या दिल्ली (delhi), उत्तर प्रदेश (up), राजस्थान(rajasthan), जम्मू-काश्मीर(jammu&kashmir) येथून मोठी मागणी असून तालुक्यातील केळी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात निर्यात होत आहे. तर खान्देशात( khandesh)येवढा दर नसल्याने त्याभागातील शेतकऱ्यांनी करमाळ्यातील व्यापाऱ्यांचा संपर्क करीत आहेत.

ऊजनी लाभक्षेत्रात करमाळा तालुक्यासह टेंभुर्णी, माढा, माळशिरस,ईंदापूर,या भागांत मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होते. मात्र गेल्याआठवड्यापासून केळी पुरवठ्या मध्ये तुडवडा जाणवू लागल्याने केळीचे दर उच्चांकी पातळीवर गेले आहेत असुन निर्यातक्षम केळी केळी ला आज दर १८ ते१९रुपये प्रति किलो.

तर खोडवा केळी १२रुपये प्रति किलो.लहान केळी ८रुपये प्रति किलो दर मिळत आहे.ऊजनी लाभक्षेत्रातील केळी दर्जेदार व निर्यातक्षम असल्याने उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर, दिल्लीबरोबरच आखाती देशातसुद्धा निर्यात होते. सध्या केळी चा पुरवठा कमी होत असल्याने खोडवा केळी बॉक्स ते पॅकींग कडे व्यापारी वर्ग वळला आहे.

कोरोणा संसर्गजन्य रोगामुळे अचानक पने निर्बंध लादले जात होते. त्यामुळे केळीचे दर चांगले असतानाही लाँकडाऊन मुळे दर पडत होते.त्यामुळे अर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.आता दर वाढल्याने मागील अर्थिक नुकसान भरुन निघत आहे.
किशोर झोळ
केळी उत्पादक. वाशिंबे. ता करमाळा.

आंध्र प्रदेशातील केळी हंगाम सुरू झाला आहे.परंतु तेथील केळी निर्यातक्षम नसल्याने निर्यातदार कंपन्यांनी तेथील मालाकडे पाठ फिरवली आहे. तर जळगाव व गुजरात येथील हंगाम मार्च नंतर सुरू होतो. त्यामुळे केळीच्या दरात वाढ झाली आहे.पुढील काळात २० ते २१ रुपये प्रति किलो दर होण्याची शक्यता आहे.
रंगनाथ शिंदे.
केळी खरेदीदार. कंदर ता. करमाळा.

पत्रकार सुयोग झोळ – करमाळा याज कडुन

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE