करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वादळीवारे वीजांचा कडकडाट मे मध्ये ४५६ टक्के पाऊस ; पन्नास पेक्षा जास्त खांब पडले तर सहा जनावरे दगावली

करमाळा समाचार – विशाल घोलप

तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसाने वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाट मध्ये मुसळधार पाऊस हा मागील सात दिवसांपासून वेगवेगळ्या भागात सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडे तसेच विजेचे खांब पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. तर वीज पडून घरावरील पत्रे उडाले शिवाय तालुक्यातील सहा जनावरांचा मृत्यूही झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत जवळपास ४५६ टक्केवारी नोंदवली गेली आहे. सर्वदुर पावसाने ग्रामीण भागाला झोडपले त्यात ३८ छोटे व बारा मोठ्या वाहिनी घेऊन जाणारे विद्युत खांब पडले आहेत, तर एक रोहित्र पडल्याने वीज विस्कळीत झाली होती.

तालुक्यात रोज वेगवेगळ्या भागात कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. शहरापासून ते ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या वेळेनुसार पाऊस वादळी तर कुठे रिमझिम पद्धतीचा होत असल्याने तालुक्यात सर्व दूर पाऊस पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. तर गावांना रात्र रात्रभर विजेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे आणि उन्हाळ्यात झालेल्या पावसामुळे ऊन नाहीसे झाले भर उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाला त्यामुळे उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी गावोगावी अद्याप शेतकऱ्यांनी शेतीची कामे केलेली नव्हती अशातच आता पाऊस पडू लागल्याने शेतीची कामे आटोपण्याआधीच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे हाल होताना दिसून येत आहेत. उजनी व पाण्याच्या परिसरात ऊस व केळीची पीक असल्याने उसाला धोका नसला तरी केळीच्या पिकाला मात्र वादळी वाऱ्याचा धोका असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

politics

सावडी परिसरात केवळ विजेचे खांबच रस्त्यावर पडले नाहीत तर वादळी वाऱ्यामुळे पश्चिम भागात घरावरील पत्रेही उडाल्याची दिसून आले. या ठिकाणी पंचनामा करून नोंदही घेण्यात आली आहे. तर विजेचे खांब हे रस्त्यावर पडल्याने त्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. तर महावितरण कडून वेळीच घटनास्थळी पोहोचून वीजपुरवठा खंडित करण्यात आला व युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले होते. तालुक्यातील सावडी, जिंती, वीट, विहाळ, कोर्टी, जेऊर, कंदर, निमगाव, रायगाव, बिटरगाव असा सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याची दिसून आले आहे.

तालुक्यात लघु वाहिनीवरील ३८ तर मोठ्या वाहिनीवरील बारा खांब पडल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्या ठिकाणी युद्धपातळीवर काम करून दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल. याशिवाय उजनीकाठी रोहित्र पडल्याने त्या ठिकाणचाही विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. तेही दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडेल तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून विद्युत पुरवठा बंद करण्याच्या सूचना द्याव्यात तर वीज थेट पोल वर पडल्याने तांत्रिक बिघाड होत आहे. त्याचीही दुरुस्ती तात्काळ केली जात आहे. नागरिकांना होत असलेल्या असुविधेबाबत आम्ही दिलगिरी आहोत.
– आशीष कलावते, उपकार्यकारी अभियंता, करमाळा.

तालुक्यातील पांगरे येथील तुकाराम पिसाळ यांच्या शेतात वीज पडून गाई ठार, उमरड येथे रघुनाथ भिसे यांच्या शेतात वीज पडल्याने म्हैस ठार, शेलगाव (वां) येथे भामाबाई देशमाने यांच्या शेतात एक गाई ठार, सावडी येथे तुकाराम काकडे यांची शेळी ठार, सावडी येथे रामदास तळेकर यांच्या घरावरील पत्रे उडाले व गाय जखमी झाली, झरे येथे वीज पडून भारत चौधरी यांची गाई ठार झाली, तर झरेत दुसऱ्या घटनेत मारुती बोराटे यांची शेळी ठार झाली. अशा घटना मागील आठवडाभरात तालुक्यात वेगवेगळ्या भागात घडून त्यामध्ये शेतकऱ्यांचे जनावरे दगावली आहेत. तर घरांचे ही नुकसान झाले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE