करमाळासोलापूर जिल्हा

दारुच्या नशेत गाडी चालवणे पडले महागात ; अपघातात माढा व कंदरच्या व्यक्तीचा मृत्यु

करमाळा समाचार 

माढा तालुक्यातील ढवळस पिंप्री येथील तीन जणांचा मोटर सायकल अपघात करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर झाल्यानंतर त्यातील दोघांचा मृत्यू तर तिसरा जखमी झाला आहे. मृता मध्ये कंदरच्या एकाचा समावेश आहे. सदरचा अपघात हा दारूच्या नशेत घडला असून नशाही चांगलीच महागात पडण्याची दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर अशा पद्धतीने दारू पिऊन गाडी चालवत स्वतः आपल्या मेव्हण्याच्या मृत्यूस जबाबदार म्हणून मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखन अभिमान कांबळे हा माढा तालुक्यातील ढवळस पिंपरी येथील रहिवासी आहे. व आपल्या भावासह कंदर येथील मेहुणा बाबजी रामचंद्र चांदणे वय 28 यास घेऊन नर्सरीच्या कामाकरिता वापरण्यात येणारी मोटरसायकल घेऊन करमाळा येथील तहसील कार्यालयात कामाच्या निमित्ताने 24 जानेवारी रोजी आले होते.

*करमाळ्यात दरोडेखोरांची दहशत ; प्रजासत्ताकदिनाच्या पहाटे बागवान यांच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न ;मारहाणीत दोन जखमी*
https://karmalasamachar.com/terror-of-robbers-in-karmala-attempt-to-rob-bagwans-house-on-republic-day-morning-two-injured-in-beating/

त्याठिकाणची काम संपवून तिघेही करमाळा टेंभुर्णी हायवेने जात असताना देवळाली पासून काही अंतरावर पुढे गेल्यानंतर तिघांनीही दारू पिली व इंदापूर च्या दिशेने निघाली जात असताना लखन गाडी चालवत होता व मेहुणा व त्याचा भाऊ मागे बसलेला होता. खडकेवाडी फाट्याच्या जवळ आल्यानंतर लखन याचा गाडीवरील ताबा सुटला व रोड च्या डाव्या बाजूला असलेल्या दगडाच्या ढिगाऱ्यावर जाऊन गाडी आदळली.

या वेळी लखन व मेव्हणा दोघेही दगडाच्या ढिगाऱ्यावर आदळले. तर फिर्यादी हा शेतात जाऊन पडला. त्यामुळे तो वाचला तर इतर दोघे दगडावर आदळल्याने निपचीत पडली होते. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्या दोघांना मयत घोषित केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE