कृषी निगडित मोबाईल ऍप्लिकेशन वापराचे प्रशिक्षण
जेऊर प्रतिनिधी – (चिखलठाण)
श्रीराम कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत धनराज सरडे यांच्याकडून चिखलठाण येथील शेतकऱ्यांना कृषी निगडित मोबाईल ऍप्लिकेशन वापराचे प्रशिक्षण देण्यात आले.

ग्रामीण शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी मोलाची मदत या अॅप मार्फत केली जाते. इफको किसान, अॅग्रीअॅप, भारत अॅग्री, किसान योजना, फार्म बी, अॅग्री मार्केट यासारख्या अॅपद्यारे हवामान अंदाज, आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पीक लागवड पद्धती, खते व कीटकनाशके यांचा योग्य वापर, शेती माल भाव व खरेदी विक्री, शासनाच्या विविध शेती योजना याबद्दल मोफत व सहज माहिती मराठी मध्ये मिळू शकते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अॅप चा वापर करण्याचे आवाहन धनराज सरडे यांनी याठिकाणी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य. डॉ हाके सर कार्यक्रम समन्वयक , कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक धीरज दोरकर, तसेच डॉ राऊत सर यांचे मार्गदर्शन लाभले.

p
श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष- मा.प्रकाश पाटील ,सचिव सौ.श्रीलेखा पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी- भाऊसाहेब वणवे , दिनेश आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कृषिदुत धनराज सरडे यांच्यामार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम चिखलठाण येथे घेण्यात येत आहे.