करमाळासोलापूर जिल्हा

पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेते व वितरक यांचा सन्मान

 प्रतिनिधी सुनिल भोसले

6 जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त करमाळा पत्रकार संघातर्फे वृत्तपत्र विक्रेते व वितरक यांचा घड्याळ व लेखणी देऊन साप्ताहिक करमाळा लोकमानस कार्यालयात सन्मान करण्यात आला.

यावेळी करमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास घोलप, सचिव नितीन घोडेगावकर, मार्गदर्शक विवेक येवले, पत्रकार सुनील सूर्यपुजारी समाधान फरतडे, संजय कुलकर्णी, संजय तेली, शेखर स्वामी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी बोलताना अध्यक्ष घोलप म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेते व वितरक हे वृत्तपत्राचा कणा आहेत, हे नसतील तर आमची लेखणी जनसामान्यापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. म्हणूनच पत्रकार व समाज यातील मुख्य दुवा ही मंडळी आहेत त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्यच आहे. पुढील काळातही त्यांनी असेच समाजकार्य करावे असेही घोलप म्हणाले.

यावेळी विवेक येवले समाधान फरतडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास हर्षद मंत्री, सागर चव्हाण, बंडू काळे, प्रशांत निरगुणकर, हरी पिंपळे, जमीर मनेरी, लखन राठोड, केशव तळेकर आदींसह वृत्तपत्र विक्रेते, वितरक तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE