आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार मा. संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेश सचिव मोहसीन शेख यांच्या शुभहस्ते शासकीय विश्राम गृह मौलाली माळ करमाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहरात व आसपासच्या परीसरात जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे संगोपन करणार असल्याचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी सांगितले.

या वृक्षारोपण समारंभासाठी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष भोजराज सुरवसे, राष्ट्रवादी किसान सभेचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय चे तालूकाध्यक्ष शिवाजी जाधव, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा सदश्य महेश काळे-पाटील, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषिकेश शिगची, शहर उपाध्यक्ष आरशान पठाण, यश कांबळे, ओंकार दळवी, श्री पिंपळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.