राजुरीत बाळनाथ मंदीर परिसरात तरुणाई कडून वृक्षारोपण
करमाळा समाचार
राजुरीत बाळनाथ मंदिर परिसरात गावातील तरुणांनी एकत्रित येऊन वृक्षारोपण करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेऊन वृक्षारोपण केले.वाढत प्रदूषण तसेच सुशोभीकरण करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून पाम, मोरपंखी सह इतर झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं.

गावातील तरुणाईला सोबत घेऊन नेहमीच अनुकरणीय उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मुलांच्या साथीने हा स्तुत्य उपक्रम पार पडला.यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा तृप्ती साखरे, हंबीरराव साखरे, सुंदरदास शिंदे, संजय सारंगकर, श्रीकांत साखरे, उदय साखरे, ज्ञानदेव दुरंदे, अनिल निरगुडे, नितीन साखरे, महादेव दुरंदे, अप्पा साखरे, उमेश साखरे, सुहास साखरे, संकेत अवघडे, अमोल साखरे, सोमनाथ शिंदे, रमेश शिंदे, सचिन निरगुडे आदी तरुण उपस्थित होते.
