करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट ; जेऊरसह १९ गावात उघडपणे थाटले दवाखाने

करमाळा समाचार


अनेकदा बोगस डॉक्टरांच्या बाबतीत तक्रारी होतात. त्या ठिकाणचे पंचनामे केले जातात व काही ठिकाणी कारवाई केली जाते. परंतु मोठे ठोस कारवाई होत नसल्याने तेच ते बोगस डॉक्टर पुन्हा पुन्हा दवाखाने उघडून सेवा देताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ ग्रामीण भागात होत असल्याचे दिसून येत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे असून संपूर्ण जबाबदारी स्थानिक समितीला देणे गरजेचे आहे शिवाय कायद्याने शिक्षाही मोठी झाल्यास संबंधित डॉक्टर नियमांची पायमल्ली करून लोकांची फसवणूक करणार नाहीत

कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना खोट्या पदव्या तयार करून बनावट डॉक्टर गावोगावी आपला धंदा जोमात करीत आहेत. बऱ्याचशा वर्षापासून ते काम करत असल्यामुळे स्थानिक लोकांचा त्यांनी विश्वास संपादन केला आहे. स्थानिक गावातील नेत्यांना हाताशी धरून सदरचा व्यवसाय वाढवत आहेत. पण या डॉक्टरांकडून दिले जाणारे सेवा ही घातक असून यामधून पुरवण्यात येणारे औषध हे आरोग्याला धोकादायक आहेत.

यामध्ये मुळव्याध, भगंदर, गुप्तरोग अशा रोगांच्या नावाखाली सदरची दवाखाने महाराष्ट्राबाहेरून येऊन डॉक्टर ग्रामीण भागात गावोगावी चालवत आहेत हे कायम निदर्शनास आले आहे. परंतु नियमाप्रमाणे कारवाई होताना केवळ एक ते दोन बनावट डॉक्टरांवर होते. त्यानंतर बाकीचे सावध होऊन दवाखाने बंद करून प्रसार होतात. यामुळे त्यांचे फावतेय. करमाळा तालुक्यात अशाच तक्रारी मिळाल्यानंतर तब्बल १९ ठिकाणी असे बनावट डॉक्टर असल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही ठिकाणी तर दवाखान्यांवरील फलक सुद्धा वेगळे व आत मध्ये वेगळे उपचार सुरू असल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागातून एखादी तक्रार आल्यानंतर आरोग्य अधिकारी यांना गटविकास अधिकाऱ्याला कळवावे लागते. त्यावेळेस गटविकास अधिकारी यांना सदरचा प्रस्ताव हा सोलापूर येथे पाठवावा लागतो. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेने पुढील कारवाई शक्य होते. पण ही प्रक्रिया वेळखाऊ असून यामधून माहिती बाहेर मिळाल्यास सदरचे बनावट डॉक्टर सावध होऊन काही दिवस आपला ठिकाणा बदलतात किंवा दवाखाना बंद ठेवतात. त्यामुळे ते कचाट्यात येत नाहीत अशा प्रकारच्या नियमांचा ते गैरवापर करतात. शिवाय स्थानीक लोकांना स्वस्तात होणाऱे उपचार चांगले वाटतात पण यामुळे भावी काळात आरोग्याचे प्रश्न उद्भवले जातात.

आज पर्यत जिल्ह्यातील कारवाई …
यापूर्वी १३ वर्षात जिल्ह्यात ६६ ठिकाणी कारवाई .. अक्कलकोट १०, बार्शी ८, करमाळा ७, माढा ७, माळशिरस ४, मंगळवेढा ४, मोहोळ १, उत्तर सोलापूर १, पंढरपूरच्या ४ ,सांगोला ९, दक्षिण सोलापूर ११ अशी कारवाई करण्यात आली आहे. २००९-२०१४ (७ कारवाई), २०१५-१६ (३७), २०१६-२०१७ (१०), २०१९-२०२३(१२) अशा पद्धतीने कारवाई झालेली आहे.

सध्या कार्यरत असलेल्या गावांची नावे …
वडशिवने, गुळसडी, सौंदे, उत्तर वडगाव, पुनवर, कात्रज, पश्चिम सोगाव, केतुर क्रमांक २, हिवरे, मिरगव्हाण, कोळगाव, पोटेगाव, हिसरे, वरकुटे, जेऊर, वांगी क्रमांक २, शेटफळ, केडगाव या ठिकाणी सदर बोगस दवाखाने अद्याप कार्यरत आहेत.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE