सी.एस.आर.डी कॉलेज अहमदनगर व भालेवाडी ग्रामपंचायत वतीने वृक्षारोपण
करमाळा समाचार
सी.एस.आर.डी कॉलेज अहमदनगर व भालेवाडी ग्रामपंचायत च्या वतिने गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला .
सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय अहमदनगर यांच्या वतिने भालेवाडी ग्रामपंचायत मध्ये प्रशिक्षणार्थी समाजकार्य कर्ता म्हणून भालेवाडी गावात क्षेत्रकार्य करत आहे असे नितीन तरंगे यांनी सांगितले .

आज गावामध्ये फळझाडे वृक्षारोपण करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फळझाडे लावण्यात आले. यामागे समाजकार्यकर्त्यांचा असा उद्देश होता की १) जमिनीची होणारे धूप रोखणे, २) पाणी पातळी वाढवणे, ३) ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत पवार, युवराज तरंगे , सतिश तरंगे, आबासाहेब तरंगे, प्रदिप डोलारे , मारूती खटके, अजित तरंगे, गोपीनाथ तरंगे, रणजित जाधव, विलास जाधव, सचिन साबळे आदी उपस्थित होते