करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

म्हसेवाडी तलावातील पाण्याचे पूजन ; चार गावांचा पाणी प्रश्न मिटला

करमाळा समाचार 


दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट नसलेला म्हसेवाडी येथील तलाव कोरडाठाक पडलेला होता. या तलावावरती पांडे, म्हसेवाडी, अर्जुन्नगर , शेलगाव इत्यादी गावातील पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याकारणाने या तलावाला दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आ.संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार प्राधान्याने पाणी देण्यात आले. उपयुक्त पातळीपर्यंत हा तलाव भरल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असून आ. संजयमामा शिंदे यांचे आभार मानत आहेत.


म्हसेवाडी तलावामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याबद्दल कमलाई शुगर कारखान्याचे चेअरमन तथा पंचायत समितीचे सभापती श्री विक्रमसिंह दादा शिंदे यांच्या हस्ते या तलावातील पाण्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अर्जुननगरचे युवक नेते समाधान भोगे, म्हसेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब अडसूळ, ज्ञानेश्वर ननवरे, रामा बिचकुले, पांडे चे युवक नेते नानासाहेब अनारसे, मा. सरपंच तुकाराम क्षीरसागर , अभिजित दुधे गुरुजी, ज्ञानदेव क्षीरसागर , नवनाथ विटकर , पत्रकार दस्तगीर मुजावर , सम्मद मुजावर , प्रगतशील शेतकरी त्रिंबक ननवरे आदिंसह पांडे, म्हसेवाडी, अर्जुननगर येथील शेतकरी उपस्थित होते .


आ. संजयमामा शिंदे यांचे मनापासून आभार – नानासाहेब अनारसे.
म्हसेवाडी तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेत समाविष्ट नसल्याकारणाने या तलावाला नियमितपणे पाणी येत नाही. परंतु गेल्यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे पांडे , म्हसेवाडी , अर्जुननगर इत्यादी भागात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झालेली आहे. ही उसाची पिके वाचवायची असतील तर त्यासाठी तलावात पाणी आल्याशिवाय पर्याय नव्हता .म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आम्ही पाणी देण्यासाठी विनंती केली होती या विनंतीनुसार त्यांनी प्राधान्याने पाणी दिले. या तलावात समाधानकारक पाणीसाठा आहे ,त्यामुळे आम्ही समाधानी असून आमचे बारमाही पिके घेण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होत आहे याबद्दल आम्ही आ. संजयमामा शिंदे यांचे मनापासून ऋणी आहोत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE