करमाळासोलापूर जिल्हा

राजुरी ग्रामपंचायत मार्फत शेतकरी व महिलांना कृषी प्रदर्शनाची सहल

करमाळा समाचार –


बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या कृषी विज्ञान प्रदर्शनास राजुरी गावातील ५० शेतकरी व बचत गटाच्या ५१महिलांनी भेट दिली. व तेथील शेती विषयक बाबींचे निरीक्षण केले .राजुरी ग्रामपंचायत मार्फत 15 व्या वित्त आयोगातून खर्च करून उमेद अभियान व गावातील १०१ जणांनी या कृषी प्रदर्शन मध्ये सहभाग घेतला.

यामध्ये लोकांनी गोड्या पाण्यातील मासेमारी, रंगीत मासे, मत्स्य बीज केंद्र, नवनविन तंत्रज्ञान, कृषी विषयक डेमो , कृषी, पशु, मत्स्य , मोत्यांची शेती, महिला बचत गटांचे स्टॉल , ड्रोन द्वारे फवारणी यंत्र, जैविक खते, कीटकनाशके, बुरशीनाशक, गांडूळ खत निर्मिती, भाजीपाला उत्पादन, नगदी पिके , तेलबिया वर्गीय पिके लागवड व तंत्रज्ञान याविषयी माहिती घेतली.

राजुरी ग्रामपंचायत चे सरपंच डॉ.अमोल दुरंदे यांच्या नेतृत्वात कृषी सहलीचे नियोजन करण्यात आले. यावेळी ग्राम सेवक श्री.रामेश्वर गलांडे, ग्राम संघअध्यक्ष सौ.रेखा मनोहर शिंदे,गणेश जाधव (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती ), ग्रामपंचायत सदस्या शामल जाधव, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय दुरंदे,प्रेरीका सौ.शुभांगी लांडगे, प्रेरीका सौ.पूनम नवगिरे तसेच गावातील सर्व समूहातील महिला ,कृषी व्यवस्थापक श्री.दादासाहेब शिंदे , मत्स्य व्यवस्थापक श्री.शंकर येवले या सर्वांनी कृषी प्रदर्शन पाहून आधुनिक पद्धतीने शेती करण्याची घेतली शपथ घेतली.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE