करमाळासोलापूर जिल्हा

उमरड येथे ऊसतोड मजुरांनी साजरी केली संत सेवालाल महाराजांची जयंती

उमरड (नंदकिशोर वलटे)

– गोर बंजारा समाजाचे कुलदैवत संत सद्गुरू सेवालाल महाराजांची 283वी जयंती उमरड येथे साजरी करण्यात आली. संत सेवालाल महाराजांचा ध्वज उभारून व प्रतिमेचे पूजन करून नामघोषाच्या गजरात पारंपरिक बंजारा गाणी गाऊन व नाचून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी उपस्थित गावकरी मंडळी व ऊसतोड कामगार यांनी गोड जेवणाचाआस्वाद घेतला.

उमरड गावात दरवर्षी प्रमाणे वाशीम जिल्ह्यातील वसंतवाडी व यवतमाळ जिल्यातील हनवतखेडा येथील बंजारा समाजातीलमजूर येत असतात. आपल्या समाजाचे संत सेवालाल महाराज हे श्रध्दास्थान आहेत म्हणून गावापासून कोसो दूर असलो तरी आनंदाने ते ही जयंती साजरी करतात. या वेळी ऊसतोड मजूर संजय राठोड म्हणाले की,संत सेवालाल महाराज हे आमचे कुलदैवत आहेत व त्यांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे आमची वाटचाल आहे.

या वेळी टोळी मुकादम दत्ता जाधव व संतोष पवार तसेच पिंटू पवार, विनोद राठोड, जयसिंग राठोड, सुनील राठोड, भारत जाधव, दिलीप राठोड, विठल राठोड, कुलदीप आडे आदी उपस्थित होते. तसेच ऊस वाहतूकदार विकास बदे,किशोर गोडगे, श्रीकृष्ण गोडगे, प्रदीप कोठावळे ,रामदास हांडे यांनी जयंतीचे नियोजन केले.या कार्यक्रमासाठी विविध गावकरी उपस्थित होते यात,निलेश चौधरी,दादा ढवळे प्रा. नंदकिशोर वलटे यांनी सेवालाल महाराजांचा इतिहास अधोरेखित केला.कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी पारंपरिक गाण्याचा फेर धरला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE