राष्ट्रवादीकडून पंचायत समितीच्या कोर्टी गणातून महिला जिल्हा उपाध्यक्षा तृप्ती ताई साखरे इच्छुक
समाचार
जिल्हापरिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आपापल्या इच्छा व्यक्त करत निवडणुक लढवण्याची तयारी चालू केली आहे..यातच कोर्टी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा विशाखा समितीच्या सदस्या तृप्ती ताई साखरे यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली आहे .

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बऱ्याच नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर अगदी पुढे येऊन तृप्ती साखरे यांनी राष्ट्रवादीच्या राहिलेल्या विस्कळीत कार्यकर्त्यांची मोट बांधून आपल्या मोजक्या सहकार्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचा मेळावा घेऊन ताकद दाखवून दिली होती.

यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाने आमदार संजय मामा यांना पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण तालुक्यात मामांच्या सोबत महिला आघाडीच्या वतीने प्रचाराची धुरा सांभाळली होती तसेच कोरोना काळात राजुरी आणि बाजूच्या गावात पक्षाच्या वतीने गरीब कुटुंबियांना धान्य वाटप , मास्क वाटप करत सतत जनतेच्या संपर्कात राहण्याचं काम केलं.
राष्ट्रवादी सत्तेत असताना मंत्रालय , जिल्हापरिषद कार्यालयात त्यांचा लोकांची कामे घेऊन सततचा वावर असताना दिसून येत होतं याच अनुषंगाने महिला आरक्षण जाहीर झाल्याने आपण पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची भावना तृप्ती साखरे यांनी बोलवून दाखवली.