करमाळासोलापूर जिल्हा

गावाचा उद्योग देशात पोहचला पण एकही मेल रेल्वेगाडी थांबत नाही ; रेल्वेला थांबा द्या – बागल

समाचार टीम

केम ता. करमाळा जि. सोलापुर हे मध्य रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्टेशन असुन सध्या केम रेल्वे स्थानकावर एकही मेल एक्सप्रेस गाडी थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांसहित व्यापारी व व्यावसायिकांचे प्रचंड हाल व नुकसान होत आहे. याकरीता केम येथील रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन हा प्रश्न मागी लावण्याचे अभिवचन मकाई कारखान्याचे चेअरमन श्री. दिग्विजय बागल यांनी काल केम ता. करमाळा येथे दिले.

काल पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त मकाई चेअरमन दिग्विजय बागल यांनी श्री उत्तेरश्वर महाराजांचे दर्शन घेवुन केम येथे सदिच्छा भेट दिली. त्यावेळी केम प्रवासी संघटनेने रेल्वे थांब्याबाबतचे स्वयंस्पष्ट निवेदन दिले.

याबाबत अधिक माहिती देताना श्री. बागल म्हणाले की, केम हे मध्य रेल्वे मार्गावरील एक अत्यंत महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. केम गाव भारत देशात कुंकू उत्पादनामुळे प्रसिध्द आहे. येथील कुंकू हे रेल्वेव्दारे चेन्नई, बैंगलुरु, दिल्ली, गुवाहाटी, अहमदाबाद आदि मोठया शहरांकडे पाठवले जाते. केम हे गाव व्यापारी, कारखानदार यामुळे देशाच्या नकाशावर प्रसिध्द आहे. जवळची १२ गांवे केम गावावर अवलंबुन आहेत. परंतु कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने रेल्वे सेवा बंद केली होती. त्यानंतर सध्या कोरून काळानंतर सध्या केम रेल्वे स्टेशनवर कोणतीही गाड़ी थांबत नाही. त्यामुळे गावातील व्यापारी, व्यवसायिक, कारखानदार, विद्यार्थी, प्रवासी आदींना याचा खुप त्रास होत आहे.

चेन्नई, बेंगलुरु, मुंबई, दिल्लीकडे जाण्यासाठी एकाही रेल्वे गाडीस केम येथे थांबा देण्यात आलेला नाही. कोरोनाकाळात बेकारी व बेरोजगारी सर्वत्र वाढली होती. आता कोरोनानंतरच्या काळातही रेल्वे थांबा नसल्याने सर्वच नागरिक, व्यावसायिक, लघु उद्योजक व कारखानदारांनी प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशी संघटनेने याबाबत सातत्याने मागणी, निवेदने यापूर्वी रेल्वे मंत्रालय व रेल्वे विभागाला सातत्याने दिली आहेत. सध्या केम व परिसरातील नागरिकांना रेल्वेच्या सेवेसाठी कुर्डुवाडी येथेच जावे लागते.

केम येथील हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस-, मुंबई-हैद्राबाद एक्सप्रस-, चेत्नई-मुंबई एक्सप्रेस- मुंबई- चैन्नई एक्सप्रेस- , मुंबई- विजयपूर फास्ट पॅसेंजर-, विजयपुर- मुंबई फास्ट एक्सप्रेस- , सोलापुर- मुंबई सिध्देश्वर एक्सप्रेस-,
मुंबई- सोलापुर एक्सप्रेस-, सोलापुर- पुणे इंद्रायणी एक्सप्रेस- ,पुणे-
सोलापुर इंद्रायणी एक्सप्रेस- या गाडयांना त्वरीत थांबा देणेबाबतची मागणी श्री. दिग्विजय बागल यांनी केली आहे.

यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, व्यावसायिक, विद्यार्थी, लघुउद्योजक व ग्रामस्थ उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE