करमाळासोलापूर जिल्हा

तालुक्यातील दोन कट्टर विरोधीगट एकत्र , मिळवला 6-1 ने विजय

करमाळा समाचार 


तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या बाळेवाडी ग्रामपंचायतीचा निकालही जाहीर झाला असून यामध्ये बागल – जगताप युतीने ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे.

बागल गटाचे नेतृत्व करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्री. सुग्रीव नलवडे तर जगताप गटाचे नेतृत्व श्री. हर्षवंदन नलवडे यांनी केले.

नवनिर्वाचित सदस्यांमध्ये प्रभाग क्रमांक१ मध्ये सौ.निर्मला हर्षवंदन नलवडे,श्री. पानाचंद संभाजी नलवडे. प्रभाग क्रमांक२ मध्ये सौ.सुलभा उद्धव नलवडे व श्री.गोरख बाबूशा माने.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये सौ. मनीषा माधव मिसाळ व श्री. नितीन हनुमंत लोंढे यांचा समावेश आहे.

ads

आम्ही विकासाच्या मुद्द्यावर हा विजय मिळवलेला आहे व आगामी काळात आम्ही गावातील विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत असे श्री.सुग्रीव नलवडे व हर्षनलन नलवडे  यांनी बोलताना सांगितले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE