करमाळासोलापूर जिल्हा

श्री आदिनाथवर कारखान्यावर आ. रोहित पवारांच्या एंट्रीपुर्वी कामगारांचे आंदोलन ; बागलांसह संचालक मंडळावर टीका

प्रतिनिधी सुनिल भोसले

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने दशरथआण्णा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या गेटसमोर टेंभुर्णी सोलापूर हायवेवर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हाजारोंच्या संख्येने सहकुटुंब महिलासह कामगार उपस्थित होते. या आंदोलनात कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी पोलिसांच्या संख्येत वाढ करून चोख बंदोबस्त ठेवुन एक किमी अंतरावर गाड्या रोकुन ठेवण्यात आल्या होत्या.

यावेळी बोलताना कांबळे म्हणाले, आम्ही कामगारांच्या पगारी मिळाव्यात व शेतकरी तोडणी वाहतूकदाराचे पैसे मिळावेत म्हणून अनेक वेळा संघर्ष केला. आंदोलन, तिरडी मोर्चासह अनेक वेळा संर्घष केला. परंतु स्वता:ला स्वाभिमाणी म्हणुन घेणाऱ्या नेत्या रेश्मी बागल कोलते तसेच कोणताही संचालक मंडळातील सदस्य कामगारांच्या भेटीला आंदोलन उपोषणे स्थळी आले नाहीत. उलट कोरोनाच्या वातावरणामध्ये कारखान्यातील कामगारांच्या लाईट व नळ कनेक्शन बंद केले होते. त्याचे कुटुंब अंधारात ठेवले होते अन्न धान्याची मदत कधी केली नाही. केवळ पगारी संघर्ष करून सुद्धा मिळत नाहीत म्हणून चार कामगारांना जीव गमवावे लागले. तरी यांना घाम फुटला नाही. कारखान्याची एवढी मोठी संपत्ती असताना कामगारांच्या पगारी व तोडणी वाहतूक धाराच्या पगारी देण्या एवढी साखर पोती शिल्लक असताना देखील स्वत:च्या स्वार्थासाठी कारखाना गहाण ठेवला आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी शरद पवार साहेब ‌याना भेटण्यासाठी गोंवीदबागेत भेटायला जातात आणी त्यांचे चमचे मात्र सांगतात कामगारांच्या पगारी संदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेत.

पुढे बोलताना कांबळे म्हणाले, शरदचंद्रजी पवार साहेब हे देशाचे नेते आणी शेतकऱ्यांनचा जाणता राजा म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात त्यांना विनंती करतो आपण शेतकऱ्यांसाठी घासातला घास दिला शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहिलात म्हणून तुम्हचा आम्ही आदर करतो. पवार साहेब यांनी कारखान्यात लक्ष घालून रोहित पवार यांना आपण कारखान्याचा कारभार पाहण्यासाठी व्यापारी रोहित शेठ म्हणुन पाठवु नका. रोहित दादा पवार साहेब म्हणुन पाठवा तरच कारखाना पारदर्शक चालेल. यातच शेतकऱ्यांच भल्ले होईल. परंतु कामगारांच्या पगारी व ऊस उत्पादकाचे पैसे देण्याची व्यवस्था करावी असे बोलतात म्हणाले.

शेवटी कामगारांच्या व्यता बघुन त्यांचे कुटुंब संचालक मंडळाच्या नाकर्तेपणामुळे उध्दवतं झालेले पाहून ते भावणीक होऊन दलित पँथरच्या स्टाईलमध्ये आक्रमक पवित्रा घेत संचालक मंडळ व बागल यांच्या वर बोलत असताना त्यांच्यावर गंभीर सुरूपाचे आरोप करत चांगलाच खरपुस समाचार घेतला. आणी गंभीर सुरूपाचा इशारा दिला. जर कामगारांच्या पगारीचा प्रश्न न सुटल्यास भिम गर्जनाच्या स्टाईलने पुढील आंदोलने केली जातील असा इशारा ही दिला.

यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याने आंदोलनकर्त्यानी कायद्याचं पालन करून आंदोलन यशस्वी पार पाडुन पोलिसांना सहकार्य केले शेवटी निवेदन नायब तहसीलदार बदे साहेब व साय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तळपे कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी निवेदन स्वीकारले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE