करमाळासोलापूर जिल्हा

बॅंकेच्या व्यवस्थापकाचा बॅंकेत दोन कोटींचा डल्ला ; व्यवस्थापकासह इतरांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार


बंधन बॅंकेच्या शाखेतील मॅनेजर ने साथीदाराच्या सहाय्याने बॅंकेत दोन दहा लाखांचा अपहार करुन पलायन केल्याने  मॅनेजरसह पाच जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सदरचे प्रकरण दि १७ रोजी बॅकेचे ऑडीट करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना जाणवले त्यानंतर मॅनेजर पळुन गेल्याने संशय बळावला व मॅनेजर राहुल साहेबराव मुंडे सह इतर पाचवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, येथील बंधन बॅकेच्या करमाळा शाखेचे दैनेदिन कामकाज सुरू असताना बॅकेचे अधिकारी ऑडीटसाठी सरप्रार्इज विझीट करिता रिजनल ऑपरेटीव्ह एक्झेक्युटीव्ह मनोज संतोषकुमार तुलशान यांनी सकाळी ९ वाजता विझीट केली. त्यावेळी तपासणी सुरु असताना काही कामा निमित्ताने राहुल बॅंकेतुन गेला पुन्हा माघारी आला नाही. तरी बॅंकेची तपासणी सुरु असताना काही खाजगी लोकांच्या नावे १२ फेब्रुवारी रोजी लाखोंची रक्कम टाकण्यात आली.

त्यानंतर त्यांच्या सहमतीने तीच रक्कम दुसऱ्या खात्यामध्ये वळवण्यात आली. एस बी आय बॅकेत व्यवहार आहेत त्याचे स्टेटमेंट मागविलेले असता त्यामध्ये दि १२ फेब्रुवारीरोजी ३०-३० लाखाचे सात चेक वठवल्याचे दिसुन आले. पण त्याची बॅंकेत कसलीही नोंद नसल्याने संशय वाढला. अशी एकूण २ कोटी १० लाखाची फसवणुक झाल्याचे दिसुन आले. त्यानंतर गायब झालेल्या व्यवस्थापकाचा शोध घेतला पण तो मिळुन आला नाही. शिवाय ज्यांच्या नावे ही रक्कम वळवली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE