करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बोकड व मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

करमाळा समाचार 

मोटर सायकल व बोकड चोरी प्रकरणी करमाळा पोलीस शोध घेत असलेल्या संशयताला ताब्यात घेण्यात यश आले आहे. त्याच्याकडून दोन मोटरसायकल व एक बोकड व चार शेळ्या मिळून आल्या आहेत असा एकूण एक लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

22 ऑगस्ट रोजी मध्यरात्री रामवाडी येथून एक मोटरसायकल व काळ्या रंगाचे बोकड चोरीला गेले होते. या संदर्भात करमाळा पोलीस तपास करीत असताना त्यांना एक व्यक्ती मोटरसायकलवर चोरीचे बोकड विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर चोरास पकडण्यासाठी सापळा रचला.

politics

यावेळी दोन इसम मोटरसायकलवर बोकड घेऊन जात असतानाचे मिळून आले. त्यामध्ये शंकर भोसले व चावल्या भोसले असे त्या दोघांचे नाव आहे. त्यांच्याकडून एक बोकड,चार शेळ्या व दोन मोटरसायकल मिळून आल्या आहेत. सदरची कारवाई पोलीस नाईक मनीष पवार, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घोंगडे, सोमनाथ जगताप, गणेश शिंदे व सायबर पोलीस वेंकटेश मोरे यांनी केली. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत गायकवाड करीत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE